
लहान आणि मध्यम व्यवसायाच्या विस्तारासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. याचे कारण म्हणजे ऑब्लिफ्री बिझनेस नेटवर्क या उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे या उद्योजकांची उत्पादने जगभरात पोहोचणार आहेत.
ब्ल्यूमार्कने उद्योजकांसाठी ऑब्लिफ्री बिझनेस नेटवर्क (एबीएन) ही सेवा देऊ केली आहे. या बिझनेस नेटवर्कमध्ये अमेरिका, स्वीडन, दुबई, सिंगापूर, जिनीव्हा, घाना, केन्या अशा विविध देशांसह जगभरातील 50 हजाराहून अधिक व्यावसायिक जोडले गेले आहे. लहान, मोठय़ा उद्योगांना जागतिक पातळीवर अमाप संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने एबीएनची स्थापना केली असून त्यासाठी तंत्रज्ञानाधारित अत्याधुनिक प्लॅटफॉर्म विकसित केल्याची माहिती कंपनीचे सीईओ गोविंदा सदामते यांनी दिली. अधिक माहिती www.ablifree.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
























































