
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस सोलापूर शहरात ‘काळा दिन’ तसेच ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसतर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘व्होट चोर’, ‘गद्दी चोर’, ‘नोकरी चोर’चा नारा देत परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस आहे. देशात सध्या अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करीत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांची मुस्कटदाबी करत प्रसारमाध्यमांवर दबाव ठेवला आहे. तर, दुसरीकडे गोदी मीडिया फोफावले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. देशात बेरोजगारी वाढली आहे. इंडिया-पाक मॅच खेळवून दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे आजचा दिवस देशासाठी काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केली.’