Vice President Election – विरोधी पक्ष एकजूट, सर्व खासदारांनी केलं मतदान; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जयराम रमेश यांचं वक्तव्य

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ७८८ पैकी ७६८ खासदारांनी मतदान केलं. यावेळी १३ खासदार अनुपस्थित होते. या निवडणुकीत इंडिया आघाडी एकजूट दिसली. तसेच सर्व खासदारांनी मतदान केलं, असं काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले आहेत.

X वर एक पोस्ट करत काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदान संपले आहे. विरोधी पक्ष एकजूट झाला आहे. विरोधी पक्षाच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे. ही अभूतपूर्व १००% मतदानाची टक्केवारी आहे.” दरम्यान, थोड्याच वेळात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे.