सलील देशमुख यांच्या उपस्थितीत संत्रा प्रक्रिया केंद्र हस्तांतरित

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्राचे आज सलील देशमुख यांच्या उपस्थितीत एमएआयडीसीला हस्तांतरित करण्यात आले. हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी 15 कोटी रुपयाची आवश्यकता असून ते मिळण्यासाठी शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

एमएआयडीसीने त्यांचा हा प्रकल्प चालविण्यासाठी नांदेडच्या सांयटेक्निक इं.प्रा.लि. कंपनीला दिला होता. संत्र्यावर प्रक्रिया होवून काटोल व नरखेड तालुक्यासह विदर्भातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा व्हावा, या दुष्टीकोनातून संबधीत कंपनी कोणतेही काम करीत नव्हती. हाच मुद्दा घेवून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयीन लढाई सुरु केली. परंतु दरम्यानच्या काळात ते अडचणीत असतांनाही अनिल देशमुख यांनी सुरु केलेली लढाई सलील देशमुख यांनी पुढे सुरूच ठेवली होती.