
>> डॉ. प्रदीप आवटे
भारतातील मृत्यूनंतर केल्या जाणाऱया अवयवदानाचे प्रमाण अवघे 0.01 टक्के एवढे आहे. जिवंतपणी जे अवयवदान केले जाते, त्यात 80 टक्के स्त्रिया आहेत. मात्र अवयव घेणाऱ्यात मात्र त्यांचे प्रमाण अवघे 19 टक्के आहे. अवयवदानाविषयी माहितीचा अभाव, अंधश्रद्धा, भीती, कायदेविषयक अज्ञान अशा कारणांमुळे अवयवदान कमी प्रमाणात होते.
भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्त्व मोठे आहे. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये इतक्या सहज व स्वाभाविकपणे आपल्याला दान करता यायला हवे. आधुनिक जगात विज्ञानाच्या नवनव्या शोधानुसार दान ही संकल्पनादेखील विस्तार पावली आहे. रक्तदान, अवयवदान याबाबी याच्याच निदर्शक आहेत.
एखाद्या व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस असे अवयव जेव्हा काम करेनासे होतात, निकामी होतात तेव्हा अवयवदानातून मिळालेल्या अवयवाच्या मदतीने त्यांना नवजीवन देता येते. अवयव निकामी झाल्यामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज खूप मोठी आहे. मात्र त्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नाहीत. भारतातील मृत्यूनंतर केल्या जाणाऱया अवयवदानाचे प्रमाण अवघे 0.01 टक्के एवढे आहे. जिवंतपणी जे अवयवदान केले जाते, त्यात 80 टक्के स्त्रिया आहेत. मात्र अवयव घेणाऱयात मात्र त्यांचे प्रमाण अवघे 19 टक्के आहे. अवयवदानाविषयी माहितीचा अभाव, अंधश्रद्धा, भीती, कायदेविषयक अज्ञान अशा कारणांमुळे अवयवदान कमी प्रमाणात होते.
यकृत, किडनी, हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, आतडी या अवयवांचे तसेच हाडे, त्वचा, कॉर्निया (डोळे), हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्या, चेता या टिश्यूंचे दान करता येते. अवयवदानाचे दोन प्रकार आहेत. जिवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान आणि ब्रेन डेड, मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान. जिवंत असताना आपण एक किडनी, स्वादुपिंडाचा तुकडा किंवा यकृताचा छोटा भाग दान करू शकतो. स्वादुपिंडाचा छोटा तुकडा कापल्यानंतरही स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यकृत असा एकमेव अवयव आहे, ज्याचा भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीनंतर तो पुन्हा वाढतो.
जिवंतपणी अवयवदान करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे. मृत्यूनंतर मृताच्या अंतिम इच्छेनुसार अथवा नातेवाईकांच्या अनुमतीने कायदेशीर प्रािढया पार पाडून अवयवदान करता येऊ शकते. यामध्ये वय, लिंग, धर्म याचे कोणतेही बंधन नाही. कोणत्या मृताचे अवयवदान करणे योग्य राहील याचा निर्णय वैद्यकीय तज्ञ घेतात.
जिवंत असताना अवयवदान करणाऱयांमध्ये अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि नातू किंवा नात यांचा समावेश होतो. लांबच्या नातेवाईकांमध्ये काका, मामा, त्यांची मुलं येतात. काही वेळा अवयवदानासाठी गरजू व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तयार असतात. मात्र रक्तगट अनुरूप न झाल्यामुळे किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे अवयवदान करू शकत नाहीत. त्याच वेळी असंच एक दुसरं कुटुंबही असतं. मग ही दोन कुटुंबे एकत्र येऊन आपल्या व्यक्तीचे प्राण वाचवतात. पहिल्या कुटुंबातील व्यक्ती दुसऱया कुटुंबातील व्यक्तीला अवयवदान करू शकतो आणि दुसऱया कुटुंबातील व्यक्तीकडूनही तसंच केलं जातं. यालाच स्वॅप ट्रांसप्लांट म्हणतात. डिसेंबर 23 ची गोष्ट आहे, कल्याणमधील रफीक शाह आणि घाटकोपरमधील आयुर्वेद डॉक्टर राहुल यादव यांची. रफीकला किडनी दिली राहुल यादव यांच्या आईने आणि राहुल यादव यांच्या पत्नीला गिरीजाला किडनी दिली रफीकच्या पत्नीने. अवयवदानाचे हे विज्ञानदेखील आपल्याला असा सर्वधर्मसमभाव शिकवते. एखाद्या व्यक्तीवरील प्रेम, मायेमुळे नात्यात नसलेली व्यक्ती, मित्र अवयवदान करू शकतो.
ब्रेन डेड ज्याला सामान्य भाषेत मेंदू मृत झालेली व्यक्ती आणि मृत व्यक्तीचे अवयवदान करता येते. ब्रेन डेड व्यक्ती म्हणजे जिचा मेंदू मृत पावला आहे तथापि हृदय सुरू आहे, पण उत्स्फूर्त श्वसन थांबलेले आहे, व्यक्ती कोमामध्ये आहे, प्रतिक्षिप्त ािढया नाहीत अशा वेळी वैद्यकीय तज्ञ या व्यक्तीला मेंदू मृत म्हणून घोषित करू शकतात.
अवयवदानासाठी नियामक व्यवस्था
मानवी अवयव व ऊती प्रत्यारोपण कायदा 1994 (दुरुस्ती 2011) या कायद्यानुसार भारतात अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाचे कार्य केले जाते. राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (National Organ & Tissue Transplant Organization NOTTO) या शिखर संस्थेमार्फत देशभरात अवयवदान आणि प्रत्यारोपणविषयक बाबींचे नियमन केले जाते.
मृत व्यक्तीचे अवयव घेताना वयाची अट
जगभरात 70 ते 80 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचे अवयव आणि ऊती यांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे. विशेषत डोळे आणि ऊती बाबतीत वयाची फारशी अडचण येत नाही. किडनी आणि लिव्हर (यकृत) आपण 70 वर्षांपर्यंत वयाच्या मृत व्यक्तीचे घेऊ शकतो. हृदय आणि फुप्फुसाच्या बाबतीत 50 वर्षांपर्यंतच्या मृत व्यक्तीचे अवयवदान स्वीकारले जाते.
अवयव प्रत्यारोपण प्रतीक्षा यादी
याकरिता ज्या रुग्णालयात ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी केल्या जातात, तेथील डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्व वैद्यकीय तपासण्यांनंतर त्या व्यक्तीस अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे असे दिसले तर त्या व्यक्तीचा समावेश प्रतीक्षा यादीत केला जातो.
ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय?
मृत व्यक्तीकडून घेतलेला अवयव ज्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करावयाचे आहे तिच्यापर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक असते. यामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी असा अवयव घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्ससाठी ट्राफिक विभागाशी समन्वय साधून मोकळा रस्ता तयार केला जातो. यालाच ग्रीन कॉरिडॉर असे म्हणतात. चेन्नईमध्ये 2014 मध्ये या प्रकारे झालेल्या हृदय प्रत्यारोपणाची घटना अनेकांना आठवत असेल. अवयवदान ही जन चळवळ करून आपण अनेकांचे आयुष्य वाचवू शकतो.
अवयव दाते व्हायचे असल्यास…
1994 च्या मानवी अवयव व ऊती प्रत्यारोपण कायद्यानुसार आपण विहित नमुन्यातील फॉर्म क्रमांक 7 भरून अवयव दाते होऊ शकतो. याकरिता आपण www.notto.nic.in या संकेतस्थळावर हा अर्ज ऑनलाईन भरू शकतो किंवा तो अर्ज या साईटवरून डाऊनलोड करून, भरून, स्वाक्षरी करून या संस्थेच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतो. सगळय़ात महत्त्वाचे पैसे देऊन, घेऊन अवयवदान करता येत नाही.
(लेखक वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ आहेत.)