आठ वर्षांपूर्वी आलेल्या पाकिस्तानी ओसामाने हिंदुस्थानात केले मतदान; आधार, रेशनकार्ड असल्याचा दावा, बारावीपर्यंतचे शिक्षणही घेतले 

कश्मीरमधून पाकिस्तानींची हकालपट्टी सुरू असतानाच हिंदुस्थानात राहत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने माघारी परतताना एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अनेक धक्कादायक दावे केले. त्याच्याकडे हिंदुस्थानी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र असल्याचा दावा ओसामा नावाच्या तरुणाने केला आहे. त्याने हिंदुस्थानात मतदान केल्याचे म्हटले आहे.
पदवीचे शिक्षण सुरू असताना हिंदुस्थानातून परत पाकिस्तानात जावे लागत आहे. याचे प्रचंड दुःख आहे. पदवी पूर्ण करून नोकरी मिळवण्याचे माझे स्वप्न अपूर्णच राहि. 2008 मध्ये आम्ही हिंदुस्थानात आलो. तब्बल 17 वर्षांपासून मी येथे राहत असून माझी दहावी, बारावी आणि पुढील शिक्षण इथेच झाले. हिंदुस्थान सरकारने आम्हाला तडकाफडकी परत पाठवण्याचा निर्णय घेताना थोडा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. माझ्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र आहे. मी एकदा मतदानही केले. मी इथेच शिक्षण घेऊ इच्छितो. आता पाकिस्तानात गेलो तर काहीही करता येणार नाही. कारण तिथे माझे भविष्य नाही, असे ओसामाने म्हटले आहे.