
पगार झालाय, पण घरखर्चासाठी एटीएममधून रक्कम काढायला जाल तर हातात मोबाईल जरूर ठेवा. कारण 10 हजार किंवा त्याहून जास्त रक्कम काढताना ग्राहकांना आपल्या पिन नंबरसोबतच आता वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपीही द्यावा लागणार आहे. एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. सध्या तरी ओटीपीची सक्ती केवळ कॅनरा बँकेने सुरू केली असली तरी हळूहळू ही सक्ती सर्वच बँकांकडून केली जाणार आहे.


























































