
गुगल मॅसेंजर ही सेवा काही स्मार्टफोमध्ये डिफॉल्ट असते तर काही युजर हे ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करतात. आता या ऍपमध्ये गुगल नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. नवीन फिचरमुळे गुगल मॅसेंजरमधील इनबॉक्समधून ओटीपी नंबर असलेले मेसेज 24 तासांत आपोआप डिलीट होणार आहे.
यामुळे फोनमधील स्टोरेजदेखील वाढण्यास मदत होईल. एक्सडीए डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार, हे फीचर गुगल मॅसेंजरच्या बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आले असून काही दिवसांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. ट्रान्झॅक्शननंतर ओटीपीचे मेसेज काही मिनिटांतच निरूपयोगी ठरतात. मात्र हे मेसेज डिलीट न केल्यामुळे विनाकारण फोनचे स्टोरेज वाढते. नव्या फिचरमुळे ही समस्या दूर होणार आहे.

























































