भूमिपुत्र विरुद्ध स्थलांतरित कामगारांच्या संघर्षावर ‘भोसले’

452

भूमिपुत्र आणि स्थलांतरित मजुरांच्या संघर्षाची कहाणी मांडणारा ’भोसले’ हा सिनेमा नुकताच सोनी लाइव्ह app वर रिलीज झाला आहे. भूमिपुत्र आणि स्थलांतरित कामगार यांच्यात संघर्ष पाहायला मिळत नाही असे क्वचितच एखादे राज्य असेल असे अभिनेता मनोज वाजपेयीने यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन देवाशिष मक्खिजा यांनी केले आहे. या सिनेमात अभिनेता मनोज वाजपेयी गणपत भोसले नावाच्या सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबलच्या भूमिकेत आहेत. जे स्थलांतरित कामगारांना स्थानिक नेत्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी मदत करतात. या सिनेमात जागेचे वाद, सांप्रदायिक भेदभाव, महिलांची सुरक्षितता यासारखे मुद्देदेखील मांडले आहेत.

’सत्या’मधील भिकू म्हात्रे, ’अलीगढ’मधील प्रोफेसर रामचंद्र सिरसनंतर आता ’भोसले’ च्या निमित्ताने तिसऱ्यांदा मनोज वाजपेयी मराठी व्यक्तिरेखा साकारणार आहे. याबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रत्येक स्तर एकच भाषा वेगवेगळ्या लहेजात बोलतो. त्यामुळे प्रत्येक भूमिका एकमेकांपेक्षा भिन्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या