हिंदुस्थानात फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी ओयो इंडिया या कंपनीने इंडिया खेलो फुटबॉलशी (आयकेएफ) सामंजस्य करार केला आहे. त्या करारानुसार ओयोकडून आयकेएफच्या सीझन-4 मधील देशव्यापी फुटबॉल उपक्रमांमध्ये सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा आणि अन्य कार्यक्रमांदरम्यान निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे टॅलेंट स्काऊटिंग कार्यक्रम आयोजित करणे, प्रशिक्षण सत्रे भरवणे आणि स्पर्धांचे आयोजन करणे, तरुण खेळाडूंना त्यांच्या फुटबॉल करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी उपलब्ध करून देणे यांचाही समावेश आहे.