चित्रकार शाहेद यांचा वास्तववादी कलाविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रकार शाहेद पाशा यांच्या वास्तववादी कलाविष्कार  जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पहायला मिळेल.

 पौराणिक व परंपरावादी पण आधुनिकतेकडे झुकणारी वास्तविकता यांचा कलात्मक समन्वय चित्रकार शाहेद यांनी आपल्या कलाकृतींतून साधला आहे. त्यांनी आपल्या कलाकृतींतून प्रत्येक व्यक्ती व तिच्या सभोवार असणारे विश्व यातील भावपूर्ण परस्परसंबंधांवर अधोरेखित केले आहेत. ऐतिहासिक, सामाजिक व पौराणिक संदर्भ असलेली तसेच कलात्मक तंत्रशुद्ध शैलीतील चित्रे आहेत. हे प्रदर्शन रसिकांना विनाशूल्क बघता येईल.