
ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता. पण त्यावेळी पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी दोन वेळा फोन केला होता. तसेच हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता अशी माहिती समोर आली आहे.
आज तकने याबाबतीत वृत्त दिले आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताने दोनदा फोन केला होता. एकदा 7 मे रोजी सांयकाळी आणि दुसरा फोन 10 तारखेला दुपारी 3.35 मिनिटांनी केला होता. दोन्ही वेळेला पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी फोन केला होता. यावेळी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सकडून हिंदुस्थानला औपचारिकरित्या संपर्क साधला होता. सात मे रोजी हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाक व्याप्त कश्मीरमध्ये अनेक दहशदवादी तळ उद्ध्वस्त कले होते.
हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 160 लोक मारले गेल्याची माहिती आहे. पण यात बहुतांश दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. बहावलपूरमध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, त्यात मसूद अजहरच्या कुटुंबीयांचा समावेश होता. हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 40 सैनिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.