पाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी तूर्त बंदच

हिंदुस्थानी विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द तूर्त बंदच राहणार आहे. आधीपासूनच असलेली ही बंदी एक महिन्याने म्हणजेच 23 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयास हिंदुस्थानही जशास तसे उत्तर देण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर पाकने हिंदुस्थानसाठी हवाई हद्द बंद केली. हिंदुस्थाननेही तसाच निर्णय घेतला होता. तेव्हापासून दोन्ही देशांची हवाई हद्द परस्परांसाठी बंद आहे.