…तर पाकिस्तान विश्वचषकातून माघार घेणार, बीसीसीआयची कोंडी करण्याचे पाकिस्तानचे नापाक इरादे

1373

हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड( पीसीबी) संतापले आहे. कारण हिंदुस्थानच्या माघारीमुळे पाकिस्तानच्या यजमानपदावरच गदा येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला अडचणीत आणण्यासाठी पीसीबीने पावले उचलंस सुरुवात केली आहे. टीम इंडिया टी-20 आशिया चषकात खेळणार नसेल तर पाकिस्तानही 2021 मध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही अशी धमकीच पाकिस्तानने दिली आहे.

टी-20 आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनातून पाकिस्तानने काढता पाय घेतला आहे, या वृत्ताचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी खंडन केले आहे. आताच्या घडीला आम्ही आशिया चषकासाठी दोन पर्यायांचा विचार करत आहोत. हिंदुस्थानने या ठिकाणी येण्यास नकार दिला, तर पाकिस्तानही 2021 मध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नसल्याचे पीसीबीने स्पष्ट केले.

आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाचा अधिकार आशियाई क्रिकेट परिषदेलाच
आशिया करंडक स्पर्धेच्या आयोजनातील बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा पीसीबी यांच्या विशेषाधिकारात येत नाही. आयोजनाचे ठिकाण आणि त्या संदर्भातील निर्णय केवळ आशिया क्रिकेट परिषद घेऊ शकते, असा दावा वसीम खान यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या