
पाकिस्तानचे सुप्रिसिद्ध कलालाकर हनिया अमीर, माहिरा खान आणि अली जफरचे इन्स्टाग्राम अकांऊट हिंदूस्थातान बॅन करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
हिंदुस्तान सरकारने आधी पाकिस्तानच्या 16 युट्यूब चॅनेल्सवर आधी देशात बंदी घातली होती. अफवा पसरू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता. हनिया आमिर ही पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने मेरे हमसफर, कभी मै कभी तू सारख्या मालिकांत काम केले होते. पाकिस्तानसोबत हिंदुस्थानातही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
माहिरा खानही मोठी अभिनेत्री असून तिने शाहरुख सोबत पठाण चित्रपटात काम केले होते. तर अली जफरनेही बॉलिवडू चित्रपटात कामं केली होती.


























































