बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी ड्रोनला पिटाळून लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जयपूर

हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती करणं सुरुच आहे. शनिवारी राजस्थानला लागून असलेल्या सीमारेषेवरून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला बीएसएफ जवानांनी पिटाळून लावले. जवानांनी या ड्रोनला पाडण्याचाही प्रयत्न केला.

हिंदुस्थानच्या सीमारेषेवरील श्रीगंगानगर येथील हिंदूमलकोट सीमेवर सकाळी 5 च्या सुमारास एक ड्रोन घिरट्या घालतं असल्याचे बीएसएफ जवानांनी बघितले. ते पाकिस्तानी ड्रोन असल्याचे कळाल्यानंतर जवानांनी त्यावर गोळीबार करत ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला. पण जवानांनी गोळीबार करताच ड्रोनने तिथून पळ काढला. दरम्यान , काही दिवसांपूर्वीही बिकानेरमधील नल भागात पाकिस्तानचे सुखोई बनावटीचे ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. रडारावर ते दिसल्यानंतर जवानांनी त्याच्यावर गोळीबार करत ते ड्रोन पाडले.