बांगलादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त हनी ट्रॅपमध्ये अडकले

बांगलादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त सैयद अहमद मारूफ हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. सैयद मारूफ हे 11 मे रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथून पळून गेले आहेत. ते एका मुलीसोबत दिसत असून ही मुलगी बांगलादेशातील बँकेची वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहे. मारूफ यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर इस्लामाबादहून 678 सीलबंद कंटेनर पाठवले आहेत, असे बोलले जात आहे. सैयद अहमद मारूफ यांनी ढाका सोडल्यानंतर त्यांच्या जागी आता मुहम्मद आसिफ उच्चायुक्त म्हणून काम करणार आहेत. सैयद मारूफ हे अचानक बांगलादेशातून का पळाले याची माहिती पाकिस्तान दूतावासाने दिली नाही.