पाकिस्तानचे खेळाडू डोपिंगमध्ये दोषी

640

पाकिस्तानचे तीन खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई गेम्समध्ये जिंकलेल्या पदकांना त्यांना मुकावे लागणार आहे. तसेच पाकिस्तानच्या या खेळाडूंना चार वर्षांच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे. डोप टेस्टमध्ये दोषी सापडलेल्या पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण व एकाने कास्य पदक जिंकले होते.

मोहम्मद नईमने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले होते. मेहबूब अलीने 400 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले होते. तसेच सामी उल्लाहने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्य पदक जिंकले होते. या तिन्ही खेळाडूंना बंदीच्या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. या शिक्षेचा कालावधी 3 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला आहे.

हिंदुस्थान, श्रीलंका, नेपाळच्या पदक संख्येत वाढ
पाकिस्तानचे तीन खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडल्यानंतर पाकिस्तानच्या पदकांची संख्या कमी झालीय. याचसोबत याचा फायदा हिंदुस्थानसह नेपाळ व श्रीलंकेलाही झाला आहे. या तिन्ही देशांचे प्रत्येकी एक पदक वाढले आहे अशी माहिती नेपाळ ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आर. के. बिस्टा यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या