
पेडर रोडवरील मुंबई बुद्धिबळ केंद्रात सुरू असलेल्या अखिल हिंदुस्थानी चेस मास्टर्स स्पर्धेत पलाश मापाराने चौथ्या फेरीतही वर्चस्व राखत सलग चौथा विजय नोंदवला. पांढऱया मोहऱयांसह खेळताना त्याने ध्रुव मुठेचा अचूक डावपेचांनी पराभव करत 4 गुणांसह आघाडी भक्कम केली. पलाशच्या बरोबरीने प्रतीक याज्ञिकनेही चौथ्या बोर्डवर आदित्य सिद्धार्थवर मात करत सलग चौथा विजय मिळवला. तर अमेय दांडेकरने सातव्या पटावर विराज राठीवर विजय मिळवत विजयाचा चौकार ठोकला आणि स्पर्धेतील रंगत वाढवली. दरम्यान, श्रेयांश सोमय्या व श्रीरंग आगरकर यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तसेच अनय बँक आणि सोहम पवार यांच्यातही गुणांची विभागणी झाली. एजीएम राजवीर नाहर आणि अहान कातरुका यांच्यातही चुरशीची लढत झाल्याने सामना अनिर्णितावस्थेत संपला.
निकाल – चौथी फेरी (टॉप 10)
श्रेयांश सोमय्या (3.5) बरोबरी वि. श्रीरंग आघारकर (3.5), अनय बँक (3.5) बरोबरी वि. सोहम पवार (3.5), पलाश मापारा (4) विजयी वि. ध्रुव मुठे (3), प्रतीक याज्ञिक (4) विजयी वि. आदित्य सिद्धार्थ (3) , राजवीर नाहर (3.5) बरोबरी वि. अहान कातरुका (3.5), पुनीत दोधिया (4) विजयी वि. आश्वी अग्रवाल (3), अमेय दांडेकर (4) विजयी वि. विराज राठी (3), अनिरुद्ध अय्यर (3.5) बरोबरी वि. तनुज दयाल (2.5), अर्जुन सिंग (3) बरोबरी वि. अमोघ भातवडेकर (3).































































