
जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने पालघरमध्ये एका नवीन पर्वाला प्रारंभ झाला आहे. भविष्यात पालघर हा संपन्न जिल्हा अशी आदर्श ओळख केवळ राज्यात नव्हे तर देशात निर्माण करेल, या आत्मविश्वासाने महाविकास आघाडी सरकार पुढची पावले टाकत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पालघर जिह्याची निर्मिती झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी जिह्याला मुख्यालयाची वास्तू मिळाली. या जिल्हा मुख्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण झाले त्या वेळी ते बोलत होते.
प्रशासनाला काैतुकाची थाप
जिल्हा निर्मितीनंतर अनेक संकटे आली. ती संकटे पेलत प्रशासकीय यंत्रणेने त्यावर मात केली. कोविडच्या पहिल्या, दुसऱया लाटेचा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने समर्थपणे मुकाबला केला. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तिसरी लाट जर आलीच तर त्यासाठीही मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था जिह्यात करण्यात आली आहे. ही प्रशंसनीय बाब आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला काैतुकाची थाप दिली.

























































