पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपची आढावा बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यामध्ये भाजपची एक महत्वाची बैठक बुधवारी रात्री पार पडली. पणजी पोटनिवडणूक कशी जिंकता येईल यावर विचारमंथन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.

पणजी येथील एका हॉटेल मध्ये पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला आणि मंत्री,आमदार तसेच पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्यांचे वाटप केले. बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आमदार मंत्र्याकडे 3 बूथची जबाबदारी देण्यात आली आहे. जबाबदारी असलेले नेते निवडणूक होई पर्यंत पणजीत तळ ठोकून राहणार आहेत.

बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदींन्हो,दीपक पाऊसकर,मिलिंद नाईक,नीलेश काब्राल,पणजीचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद मांद्रेकर,राजेंद्र आर्लेकर, गणेश गावकर, रमेश तवडकर,सदानंद तानावड़े,संघटनमंत्री सतीश धोंड,आमदार ग्लेन टिकलो,एलिना सालढाणा आदि नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.