पणजीत आज देखील कडकडीत लॉक डाउन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनचा शेवटचा दिवस देखील पणजीवासीयांनी कडकडीत पाळला. किराणा माल, भाजीपाला, दूध, चिकन, मासे, मेडिकल स्टोसर्स वगळता सगळी दुकाने बंद होती. ग्राहक देखील फारसे नसल्याने पणजीत रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. पणजी मार्केट मध्ये गर्दी होऊ नये,लोकांनी मास्क वापरावेत यासाठी पोलिस गस्त घालत आहे.व्यापारी आणि ग्राहक देखील मास्क घालून बाजारात दिसून आले.

पर्यटन व्यवसाय आणि कॅसिनो बंद असल्याने पणजीत पर्यटक देखील दिसत नाहीत. पणजी येथील प्रसिद्ध चर्च चौकात देखील सन्नाटा पहायला मिळत आहे. लॉक डाउनचे काटेकोर पालन व्हावे म्हणून पोलीस सर्वत्र गस्त घालत असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.
कोविड लसीकण सुरु असून 45 वर्षांवरील पात्र लोक येऊन लस घेत आहेत.काही ठिकाणी उपहारगृहे सुरु असून कामगार वर्ग तेथे येत असल्याचे पहायला मिळाले.