पंढरपूर – विश्वास भागवत हत्ये प्रकरणी दोन मारेकऱ्यांना अटक

316

जमिनीच्या वादातील पैशावरुन रविवारी विश्वास भागवत याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येत वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. विक्रमसिंह भिकु म्हमाणे, ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड अशी दोघांची नावे आहेत.

विक्रमसिंह भिकू म्हमाणे याने हातातील पिस्तुलने विश्वास भागवत याचेवर गोळी झाडुन त्यास तू आमच्या जमीनीचे पैसे आम्हांस मागतो का? असे म्हणून विश्वास उर्फ बापू बबन भागवत यांचा खून केला. तेव्हा तुकाराम बंडगर हा पाठीमागे पळाला असता त्यावर पिस्तुलने फायर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम आप्पा बंडगर सोडवा-सोडवी करीत असताना विक्रमसिंह भिकु म्हमाणे याने तुकाराम बंडगर यास ‘तुझ पण बघतो, तू वाचलाय’, असे म्हणाला. यानंतर तुकाराम यास मागून जोरात ओढले व हाताच्या बुक्क्याने मारुन खाली पाडले. त्यानंतर दोघे ऋषीकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड मोटारसायकलवरून पळुन गेले. सदर घडल्या प्रकाराबाबत तुकाराम आप्पा बंडगर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विक्रमसिंह भिकु म्हमाणे व ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय ताड यांचेविरुद्द दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या