मजुराला सापडला 40 लाखांचा हिरा

मध्य प्रदेशातील पन्ना येथे एका मजुराला खाणीत 11 कॅरेटचा हिरा सापडला आहे. मजुराने हा हिरा सरकारी कार्यालयात जमा केला आहे. या हिऱ्याची किंमत बाजारात तब्बल 40 लाख रुपये आहे. हा हिरा खूप स्वच्छ आणि मौल्यवान आहे. या हिऱ्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. लिलावामधून येणाऱ्या रक्कमेतील 12.5 टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून कापून उर्वरित रक्कम मजुराला दिली जाणार आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिह्यात 12 लाख कॅरेट हिऱ्यांचा साठा असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी खाणकाम करताना अनेकांना हिरा सापडतात.