
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटस्साठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2,155 कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाच्या समजण्यात येण्ऱ्या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत, यात महाराष्ट्रातील 19 कॅडेट्सची निवड झाली आहे. राज्यातील 116 एनसीसी कॅडेट्स 1 जानेवारीपासून या शिबिरात दाखल झाले आहेत. यात 77 मुले तर 39 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेट्स हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरित 100 कॅडेटस् हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.























































