पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जवानांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-new

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीआरपीएफ, बीएसएफ, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस अशा निमलष्करी दलांना हिंदुस्थानी लष्कराच्या तुलनेत मिळत असलेल्या कमी सोयींचा निषेध करण्यासाठी आज निमलष्करी दलाच्या निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. केंद्र सरकार निमलष्करी दलातील जवानांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत या निवृत्त जवानांनी मोदींना याचा लोकसभा निवडणूकीत फटका बसेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘आम्हाला नेहमी लष्कराचे सावत्र भाई असल्यासारखी वागणूक दिली जाते. आम्हाला 2004 पासून निवृत्ती वेतन दिले गेलेले नाही. वन रँक वन पेन्शन लागू झालेले नाही. आम्हाला शहीदांचा दर्जा देखील दिला गेलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर त्याचे परिणाम या निवडणूकीत त्यांना दिसतीस’, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.