परभणी जिल्ह्यात आणखी 8 कोरोना बाधीत रुग्ण सापडले, पाच जण कोरोनामुक्त

 

परभणी जिल्ह्यात आज ८ कोरोना रुग्ण आढळले. शहरातील कडबी मंडई परिसरात एक २८ वर्षीय पुरुष, सेलू शहरातील शास्त्रीनगर येथील ६० वर्षीय पुरुष, परभणी तालुक्यातील करडगाव २ रुग्ण तर शहापूर येथे १, गंगाखेड़ शहरातील पूजा मंगल कार्यालय, वकील कॉलनी परिसरात ३० वर्षीय महिला व ३५ व ४० वर्षीय पुरूष असे एकुण ८ रुग्ण आढळले. तसेच आज प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालाप्रमाणे ७२ व्यक्तीचे स्वॅब निगेटीव्ह तर ८ व्यक्तीचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या १६२ एवढी झाली आहे. तसेच १०७ जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. संक्रमीत कक्षात आता ५१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित पाच व्यक्तीना रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुक्त झाल्याने आज डिस्चार्ज दिला. त्यामध्ये परभणी तालुक्यातील झरी येथील एक ४५ वर्षीय महिला, ४५ व ४९ वर्षीय पुरुष, तालुक्यातील पाथरा येथील एक २९ वर्षीय पुरुष, जांब येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ७७ संशयित दाखल झाले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्व संशयितांची तपासणी केली. पाठोपाठ नांदेड येथील प्रयोगशाळेकडे ७७ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. त्यामुळे आता नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबीत स्वॅबची संख्या ९२ एवढी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण २९६८ संशयित दाखल झाले आहेत. ३१८७ जणांचा स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी २७९२ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या १६२ एवढी असून अनिर्णायक अहवालाची संख्या ९५ एवढी झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी आवश्यक नसणा-या स्वॅबची संख्या ४७ एवढी आहे. जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण १४९ रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले १८६ जण असून विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २६३३ एवढया व्यक्ती आहेत. परदेशातून आलेले ७४ व त्यांच्या संपर्कात आलेले ६ व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

सेलू शहरात कोरोना बाधीतांची संख्या दररोज वाढत असल्याने शहरवासीयांनी धसका घेतला आहे. कालपर्यंत चार कोरोनाचे रुग्ण होते आज पुन्हा तालुक्यातील करडगाव येथे एक रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने शहरासह लगतच्या परिसरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या