परभणी – मरडसगाव येथील गोदावरी पात्रात दोघांचा बुडून मृत्यू

267

पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली.आशीष भिकु साळवे (12) आणि मेहुल सुधाकर लोखंडे (8) असे मृत मुलांची नावे आहेत. पाथरी तालुक्यातील ढालेगावच्या उच्च पातळीच्या बंधार्याचे बँक वाटरचे पाणी मरडसगावच्या शिवाराच्यापलीकडे आहे. सध्या पात्रात पाणी असल्याने ऊन्हाळ्याच्या दिवसात या गावातील तरुण रोज पोहण्यासाठी जातात. शुक्रवारी सकाळी 11 वाजता इतर मुलांसोबत आशीष आणी मेहुल हे दोघे पोहण्यास गेले होते. मात्र पात्रातील एका खड्यात ते पाय घसरुन पडले. यात दोघेही मुल बुडाली. इतर मुलानी आरडाओरड केल्या गावातील नागरीक येईपर्यंत पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या