सतत शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या महिलेच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। परभणी

‘मी टू’सारख्या मोहिमेतून महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतानाच परभणीत मात्र महिलेच्या जाचाला कंटाळून एका विवाहीत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन मिटकरी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी सचिनने लिहलेली चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात त्याने महिलेने बदनामीची धमकी दिल्यानेच आयुष्य संपवत असल्याचे सांगितले आहे. यामुळे संबंधित महिलेनेच सचिनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला असून महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरातील दत्तधाम परिसरात सचिन राहात असून तो विवाहीत होता. आरोपी महिला त्याच्याकडे सतत शरीर सुखाची मागणी करायची. ‘माझ्यासोबत शारिरिक संबंध ठेव, नाही तर बदनामी करेल’, अशी धमकीही ती त्याला द्यायची. यामुळे सचिन कंटाळला होता. रोज रोजच्या या जाचाला कंटाळून अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो मित्राच्या घरी गेला. तिथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महिलेच्या धमकीनंतर बदनामीच्या भीतीने मी माझे जीवन संपवत आहे, असे सचिनच्या सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मजकूर लिहून ठेवला आहे. तसेच धमकी देणाऱ्या महिलेचे इतर २ तरुणांसोबतही लैंगिक संबंध आहे, असाही उल्लेख सचिनने यामध्ये केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे याच महिलेने दोन दिवसांपूर्वी सचिनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सुरू होताच हताश झालेल्या सचिनने आत्महत्या करून जीवन संपवले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.