प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस पलटी; एक ठार, दोन जखमी

815

सेलू ते परभणी अशी खासगी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा या अपघाताच्या निमित्ताने समोर आला आहे.

रविवारी दुपारी झालेला अपघात हा ट्रॅव्हल्सच्या स्टेअरिंगचा स्क्रू तुटल्याने वाहन चालक दीपक गिरी याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही ट्रॅव्हल्स पलटी झाली. यामध्ये गाडीचा क्लिनर सय्यद नवाब सय्यद याचा मृत्यू झाला आहे. तर सुमनबाई दवंडे व जनाबाई पंडागळे या दोन महिला जखमी झाल्या आहेत. सेलूहुन परभणीकडे जाणारी ट्रॅव्हल्स ही फिल्टर जवळ आल्यानंतर स्टेअरिंगचा स्क्रू तुटल्याने चालकाचा ताबा सुटून ही ट्रॅव्हल्स पलटी झाली. यावेळी 10 ते 15 प्रवासी वाहनात होते ,असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे,पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, पोलीस हवालदार अनंता थोरवट, बाळासाहेब कदम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या