परभणीत पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आरोपीला अटक

451
murder-knife

परभणीतील जुना मोंढा भागातील हॉटेल दिलकश येथे शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून एका 35 वर्षांच्या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शेख हमीद शेख हुसेन ( वय 35, रा. मराठवाडा प्लॉट) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा येथील हॉटेल दिलकश येथे विजय वाकळे यांच्यासोबत वाद झाला. त्यांचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये विजय वाकळे याने धारदार तीक्ष्ण हत्याराने शेख हमीद याच्यावर सपासप वार करून त्याला ठार मारले. याप्रकरणी नानलपेठ पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या