
नर्सिंग पेपरफुटी प्रकरणात दोन परिचारिकांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राखी चव्हाण आणि राणी चव्हाण अशी या परिचारिकांची नावे आहेत. परभणी शहरातील इंदिरा नर्सिंग महाविद्यालयात घेण्यात आलेल्या नर्सिंगच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो व्हॉटस्अॅपवर टाकण्यात आला होता.केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात परीक्षा पर्यवेक्षिका राखी चव्हाण आणि तिची बहीण राणी चव्हाण या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




























































