तापाने फणफणलेल्या मुलांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयापासून गावापर्यंतचा रस्त्याही खराब होता आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने पालकांनी मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखल तुडवत 15 किलोमीटर पायपीट केली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात दुर्गम भागात असणाऱ्या पत्तीगाव येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव रमेश वेलादी (वय – 6 वर्ष) आणि दिनेश रमेश वेलादी (वय – साडेतीन वर्ष) अशी मृतांची नावे असून ते अहेरी तालुक्यातील येर्रागड्डा येथील रहिवासी होते. आई-वडिलांसोबत ते आजोळी पत्तीगाव येथे आले होते. तिथेच दोघेही आजारी पडले. आरोग्यकेंद्र दूर असल्याने पालकांनी आधी त्याला एका पुजाऱ्याकडे नेले. पुजाऱ्याने त्यांना जडीबुटी दिली, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली.
पालकांनी मुलांना घेऊन जिमलगट्टा आरोग्यकेंद्र गाठले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. बाजीराव आणि दिनेश या दोघांचाही दीड तासांच्या अंतराने मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आरोग्य केंद्रापासून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांना 15 किलोमीटर पायपीट करावी लागली. याचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत सरकारवर हल्ला चढवला आहे.
तापाने फणफणलेल्या मुलांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयापासून गावापर्यंतचा रस्त्याही खराब होता आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने पालकांनी मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखल तुडवत 15 किलोमीटर पायपीट केली. काळीज पिळवटून टाकणारी घटना गडचिरोली येथे घडली. pic.twitter.com/Z3sWMaqcmj
— Saamana (@SaamanaOnline) September 5, 2024
दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत 15 किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले, असे वडेट्टीवार म्हणाले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.
आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास… pic.twitter.com/ekQBQHXeGu
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 5, 2024