
देवाभाऊंचे महायुतीचे सरकार हे चिरीमिरीचे सरकार बनले आहे. मंत्रालयापासून पंचायतीपर्यंत ‘काय तरी देवा नि काम करून घेवा’ असाच कारभार चालला आहे. राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या ऑफिसमध्ये लाच घेताना लिपिकाला रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच आज बीडच्या परळीमध्ये तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचखोरी प्रकरणात एसीबीच्या जाळय़ात सापडले आहेत.
तहसीलदार मुंडे यांनी सॉल्वन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी एका व्यक्तीकडून 50 हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार सौदा ठरला. मात्र त्या व्यक्तीने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने मुंडे यांच्यासाठी सापळा रचला होता. परंतु मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतरही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करून मुंडे यांना ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सरकारी कर्मचारी-अधिकारी लाच स्वीकारताना पकडले गेले. महायुती सरकारमधील मंत्रीच भ्रष्टाचार करत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनाही धाक राहिलेला नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
लाचखोरांचा सुळसुळाट… ही आकडेवारीच घ्या
n 6 डिसेंबर 2025 ः वाशीममध्ये उपसरपंच अंबादास कराळ आणि ग्रामसेवक विनोद भुरकाडे यांना दोन हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामपंचायत कार्यालयातच अटक.
n 16 डिसेंबर 2025 Š शेतकऱ्याकडून आठ हजार रुपये लाच घेताना मंगळवेढय़ाचे कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे यांना अटक.
n 17 डिसेंबर 2025 Š कृषी पर्यटन पेंद्रासाठी एनओसी देण्यास 20 हजार रुपये लाच स्वीकारताना पालघरच्या नवापूर ग्रामपंचायतील ग्रामविकास अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे यांना अटक.
n 3 जानेवारी 2026 Š गुन्हेगाराला मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय धोंडीराम बिडगर यांना अटक.
n 10 जानेवारी 2026 Š थकीत लाभाचे बिल काढून देण्यास लाच स्वीकारताना गोंदियाच्या विद्या गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अजया जागेश्वर चुटे यांना अटक.
n 1 फेब्रुवारी 2026 Š नाशिकमध्ये भूमी अभिलेख अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपिक अमोल भीमराव महाजन यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना अटक.
n 11 फेब्रुवारी 2026 Š नंदुरबारमध्ये वाढीव बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी आठ लाख रुपये लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे यांना रंगेहाथ अटक.
n 12 फेब्रुवारी 2026 Š मंत्रालयात अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक.
n 16 फेब्रुवारी 2026 Š नांदेडच्या लोहा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे याला एका शिक्षकाला रजा मंजूरीसाठी तीन हजार रुपये लाच घेताना अटक
n 18 फेब्रुवारी 2026 Š कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे व पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने गुन्हा नोंदवण्यासाठी 1 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
n 20 फेब्रुवारी 2026 Š भिवंडीतील अंबाडी ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील सीताराम पाटील यांना बिल्डरकडून 1.7 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक.
































































