पाथर्डी तालुक्यातील उद्योजकाकडे मागितली एक कोटीची खंडणी, गुन्हा दाखल

पाथर्डी तालुक्यातील एका उद्योजकाकडे एक कोटीची खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असून याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसगाव येथील उद्योजक धीरज सदाशिव मैड यांनी सोमवारी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मैड हे तिसगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक असून त्यांचा सराफ व्यवसाय,पेट्रोल पंप व इतर उद्योग व्यवसाय आहेत. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

धिरज मैड हे रविवारी (ता.9) रोजी सकाळी तिसगाव येथील राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर फोन करुन एक अज्ञात इसम हा म्हणला की, मुझे पहचाना क्या, मै जहा बैठा हु वहा तुमारी सरकार और पोलीस पौहच नही सकती. हमने बहुत लोगोका गेम किया है, तो भी पोलीस हमारा कुछ बीघाड नही पाई.आपको जान प्यारी है, तो तुम मुझे एक खोका दो नही दिया तो तुझे और तेरे बच्चोको मार डालुंगा.अशी धमकी दिली त्यानंतर मैड यांनी फोन ठेवुन दिला.पुन्हा 9.30 वाजता फोन करून मैड यांना एक इसमाने धमकी देवुन एक खोक्याची (एक करोडची) मागणी केली. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पावण्यानऊ वाजता (ता.10) फोन करुन एक कोटी रुपायाची मागणी करुन म्हणाला की, जर तुला तुझ्या कुटुंबाला जिवंत राहीचे असले तर मला एक कोटी रुपये दे,नाही तर मी तुला व तुझ्या कुटुंबाला जिवेच ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. मी पुन्हा तुला फोन करीन विचार करुन सांग असे बोलून फोन ठेवून दिला. या सर्व प्रकाराने व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस हे चा नंबर वरून धमकी देण्यात आली त्यानंबरचा तपास करत आहे.