नववर्षाच्या स्वागतात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल

387
प्रातिनिधिक

पाथर्डीत वाढदिवस आणि नववर्षाचे स्वागत करताना तलवार घेवुन डिजेच्या तालावर नाचणाऱ्या युवकांच्या टोळक्यावर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन बेकायदा हत्यार बाळगुन जमावबंदी आदेशाचा भंग करण्याची घटना बुधवारी फुंदेटाकळी फाटा येथे घडली. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे रा. फुंदेटाकळी यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी एक जानेवारी २०२० रोजी सायंकळच्या वेळेला फुंदेटाकळीफाटा येथे किरण गोरक्ष फुंदे याचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी युवकांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी संदीप घुले यांचा डीजे लावला होता. डीजेसमोर नाचताना युवकांच्या हातामधे उघडी तलवार होती. तलवार हातात धरुन नाच करण्यात युवक दंग झाले होते. फुंदे टाकळीफाटा येथुन या घटनेची माहीती जिल्हा पोलिसांना मिळाली. अहमदनगर येथील पोलिसांनी पाथर्डी पोलिसांना घटनेची माहीती सांगितली. त्यानंतर पाथर्डी पोलिसांनी खात्री केली तेव्हा वाढदिवसाचा कार्यक्रम जोरात सुरु होता. याबाबत किरण बडे (पोलिस कर्मचारी ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन बेकायदा हत्यार बाळगुन जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या