पाटोदा – कोरोनाग्रस्त व्यक्तीने सांगितला चुकीचा पत्ता, दिवसभर प्रशासन शोध घेऊन बेजार

756

बुधवारी रात्री आलेल्या कोरोना अहवालात शहरातील भाकरेवस्ती येथील एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडुन जाहीर केले होती. परंतु सदर व्यक्ती भाकरे वस्ती अथवा आसपासच्या परिसरात राहत नसल्याचे माहिती समोर आली असून या व्यक्तीने प्रशासनाची दिशाभुल केलेचे समजते आहे.

बुधवारी जिल्ह्यातील 108 कोरोनाग्रस्त रूग्णांचा अहवाल पाॅझीटिव्ह आला होता. त्यामध्ये नगर येथील खासगी रुग्णालयात स्वॅब दिलेला पाटोदा शहरातील भाकरेवस्ती येथील 55 वयाचे व्यक्ती पाॅझीटिव्ह आल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. परंतु सदर नावाचा व्यक्ती या परिसरात शहरात राहत नसल्याचे समोर आल्याने आरोग्य प्रशासन, नगरपंचायत, महसुल, पोलीस प्रशासन दिवसभर शोध घेत होते. मात्र रूग्णांने दिलेला रहिवासी पत्ता हा खोटा असून व रुग्णांने दिलेला दुरध्वनी क्रमांक पण खोटा दिल्याने प्रशासन बेजार झाले आहे.

प्रशासनास सहकार्य करा
बुधवारी रात्री आलेल्या अहवालात शहरातील एक रूग्ण सापडल्याची माहिती पोर्टलवर दिसल्याने रुग्णांनी दिलेल्या दुरध्वनी क्रंमाकवर संपर्क केला असता क्रमांक व पत्ता दोन्ही चुकीचे अढळल्याने प्रशासनास अडचण निर्माण झाली. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांनी माहिती खोटी सांगु नये प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मीकांत तांदळे यांनी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या