पातोडा ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पातोडा ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागला आहे. गेली 30 वर्षे पातोड्याच्या राजकारणावर एकहाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीत आदर्श गाव पातोड्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलींसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

पातोडा ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून 8 जागा पेरे पाटलांच्या विरोधी पॅनेलने आधीच बिनविरोध मिळवल्या होत्या. तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनेलचे तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यात त्यांच्या मुलीचाही समावेश आहे.

पातोडा ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 11 जागा कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनेलच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे आता पातोडा गावात तीस वर्षांनंतर नवा सरपंच आणि नवे कारभारी पहायला मिळणार आहेत. तब्बल तीस वर्षांनंतर भास्करराव पेरे पाटील पातोड्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत.