मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी

मराठी भाषेत बोलण्यावरून परप्रांतीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक मोठ मोठ्या नेत्यांपासून ते अगदी सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणात बोलायला सुरूवात केली. दरम्यान आता एका कलाकारांने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंह यांनी मराठी-हिंदी भाषेवर आपली प्रतिक्रिया दिली. मला मराठी येत नाही आणि मी मराठी बोलणार नाही, असे पवन सिंहने स्पष्टपणे सांगितले. यामुळे पुन्हा एकदा देशात संतापाची लाट उसळली आहे.

अभिनेता पवन सिंह यांने मराठीच्या मुद्द्यावर उद्दामपणे भाष्य केलं. मी बंगालमध्ये जन्माला आलोय. पण मला बंगाली येत नाही. मला असंही वाटत नाही की मी बंगाली शिकू शकेन. म्हणूनच मी ती बोलत नाही. मला मराठीही येत नाही. मला हिंदी बोलण्याचा अधिकार आहे. मी महाराष्ट्रात राहतो मग मी मराठी का बोलावे. जेव्हा मी मुंबईत काम करायला जाईन. लोक जास्तीत जास्त काय करतील, ते मला मारतील का? मला मरण्याची भीती वाटत नाही. मला मराठी येत नाही. तुम्ही मला मारले तरी मी मराठी बोलणार नाही, असे या अभिनेत्याने म्हंटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Singh (@singhpawan999)

पवन सिंग भोजपुरी इंडस्ट्रीतील एक ज्येष्ठ गायक आणि अभिनेता आहे. आतापर्यंच त्याची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. पवन सिंगने बॉलीवूड चित्रपट ‘स्त्री 2’ मध्ये एक गाणे देखील गायले होते.