
सामना प्रतिनिधी । लोहा
भरधाव ट्रक चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणाने ट्रक चालवून पादचाऱ्यास उडविले पादचाऱ्याचा उपचारादरम्यान विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मुत्यू झाला. लोहा पोलिसांनी ट्रक चालकास ट्रक सहित ताब्यात घेतले सदरील घटना लोहा शहरातील शनिदेव मंदिरा जवळ घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील शनिदेव मंदिराजवळ पादचारी चालत जात असता माल ट्रक चालकाने चांद हुजेलखा पठाण (वय 40 वर्ष) यांना भरधाव वेगात निष्काळजी पणाने ट्रक चालवून जोरदार धडक दिली असता पादचारी चांद हुजेलखा पठाण यांना गंभीर जखमी केले असता त्यास पुढील उपचारार्थ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मुत्यू झाला.
लोहा पोलिसांनी सदरील प्रकरणी ट्रक चालकास ट्रक सहित ताब्यात घेतले त्याच्या विरोधात लोहा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालु आहे आशी माहिती पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी दिली.





























































