पेण एसटी स्थानकात अपघात एसटी खाली चिरडून प्रवासी ठार

2235

पेण येथील एसटी स्थानकात कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आत्माराम ठाकूर (रा. ओढंगी, ता.पेण) हे प्रवासाकरता सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्थानकात आले होते व एसटीची वाट पहात होते.

या वेळी एसटी स्थानकात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेला प्रतीक परशुराम ठमके याने सुरक्षा रक्षकाचे काम सोडून बेकायदेशीर रित्या एसटी गाडीत चालकाच्या सिट वर बसला व एसटी सुरू केली एसटी वरील त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडी उभे असलेले प्रवासी आत्माराम ठाकूर यांच्या अंगावर गेली व या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुरक्षा रक्षक प्रतीक ठमके हा एसटी चालवायला शिकत असल्याची चर्चा पेणमध्ये सुरू होती. सदर अपघात प्रकरणी सुरक्षा रक्षकाविरोधात एसटीने पेण पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती एसटी डेपो व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी पत्रकारांना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या