पेण – कळवे गावात चोरीच्या उद्देशाने दांपत्यावर हल्ला, पत्नी गंभीर

447

पेण तालुक्यांतील कळवे गावात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांनी पती आणि पत्नीवर हत्याराने वार केला. यात ते दोघेही जखमी झाले असून पत्नी गंभीर आहे.

फिर्यादी खताचे व्यापारी अशोक पाटील हे कुटुंबासह कळवे गावात राहतात. शनिवारी रात्री ते नेहमी प्रमाणे जेवण करुन झोपले असताना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला.  फिर्यादी यांच्यावर धारधार हत्याराने वार करुन त्यांच्या गळ्यातील 6 तोळे सोन्याची चैन हिसकावून घेऊन सदर अज्ञात इसम पळून गेला. या हल्ल्यात अशोक पाटील व त्यांची पत्नी मंजुळा पाटील हे दोघेही जखमी झाले. मंजुळा पाटील या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पेण येथील म्हाञे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचे वृत्त कळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन जाधव व दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी तातडीची घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी रायगडचे श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या