
हिंदुस्थानी लष्कर आणि हवाई दलासाठी अत्याधुनिक लाइट हेलिकॉप्टर ध्रुवला तपासणी केल्यानंतर उड्डाण करण्यास परवागी देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) लवकरच लाँच करण्याची योजना आखत आहे. 5 जानेवारी 2025 ला पोरबंदर येथे हेलिकॉप्टर अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला होता हे स्पष्ट झाल्यानंतर ध्रुवचे उड्डाण थांबवण्यात आले होते. या अपघातात कोस्ट गार्डचे दोन वैमानिक आणि एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला. एएलएच ध्रुव व्यतिरिक्त अन्य हेलिकॉप्टरमध्येही दोष आढळला होता. त्यामुळे जानेवारी 2025 पासून 300 हून अधिक हेलिकॉप्टरची उड्डाणे बंद करण्यात आली होती.