परभणीत सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू

1170

परभणीत पांडुरंग कांबळे या सर्प मित्राचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे आज दुपारी मृत्यू झाला. कांबळे बऱ्याच वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करीत होते. आतापर्यंत त्यांनी अनेक विषारी साप पकडून ते जंगलात सोडले होते.

मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झरी येथील शेतात काम करीत असताना त्यांना मोठा नाग दिसून आला आला. त्यांनी हा नाग पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या हाताला नागाने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर त्यांना लगेच चक्कर यायला लागली म्हणून त्यांना झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे झरी परिसरात शोकळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या