जिममध्ये स्क्वॅट मशीन मेंबरच्या अंगावर पडले. पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याची शक्यता धूसर

ब्राझीलमधील जिममध्ये शुक्रवारी स्क्वॅट मशीनचा लीव्हर ४२ वर्षीय व्यायामपटूवर  कोसळल्यानंतर रेजिलॅनियो दा सिल्वा जबर जखमी झाला आहे. त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे, पण चालता येण्याची, हालचालीची शक्यता जेमतेम 1% आहे.

रेजिलॅनियो दा सिल्वाने   व्यायामादरम्यान काही क्षणांची विश्रांती घेतली होती. आणि बेंचवर बसला होता तेव्हा 330 पौंड प्लेट्स असलेले मशीन त्याच्या मानेवर कोसळले. बाकी मेम्बर्स मदतीला धावले आणि त्याची सुटका केली. त्याच्या मानेवर चार तास शस्त्रक्रिया करण्यात आली. पण अजूनही डॉक्टर त्याच्या चालण्याची ग्वाही देऊ शकत नाहीत. व्यायामशाळेच्या माहितीनुसार  मशीन 60 दिवसांपूर्वी खरेदी करण्यात आली होती आणि ती सुस्थितीत होती.