गेल्या आठवड्याभरात पेट्रोलची सलग दरवाढ

192
petrol-dispencer

गेल्या आवड्याभरात सलग सहा दिवस पेट्रोलची दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसात पेट्रोलचे दर 1.59 रुपयांनी वाढ झाली आहे तर डिझेलचे दर 1.31 रुपयांनी वाढले आहेत. रविवारी पेट्रोलचे दर 27 पैशांनी तर डिझेलचे दर 18 पैशांनी वाढले आहेत.

16 सप्टेंबर रोजी इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन मोठय़ा रिफायनरींवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अरेबियाने निम्मे तेल उत्पादन थांबवले होते. त्यामुळे जगभरात तेलाचे दर वाढले आहेत.  त्याचाच फटका हिंदुस्थानच्या तेल कंपन्यांना देखील बसला असून त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या