पेट्रोल @ 92.19 रुपये… ‘अच्छे दिन’ सोडा, ‘बरे’ दिन तरी येतील का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंधन दरवाढ दररोज उच्चांक गाठताना दिसत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलने दरवाढीचा नवा उच्चांक गाठला आहे. परभणी आणि नांदेड येथे दरवाढीने विक्रमी आकडा गाठला असून नांदेड मधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 रुपयांवर पोहोचलं आहे. दुसरीकडे परभणीत 91.22 अशा किमतीने पेट्रोल विकलं जात आहे.

पेट्रोलच्या किमतीत आज 15 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 7 पैशांनी वाढ झाली. मुंबईत 89.44 रुपये लीटर दराने पेट्रोलची विक्री होताना दिसत आहे, तर डिझेल 78.33 रुपयांवर पोहोचलं आहे. हा दर असाच वाढत राहिला तर काहीच दिवसात दरवाढ शंभरीपार होण्याची शक्यता आहे. अच्छे दिनची स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने ही वाढ रोखू शकत नसल्याचं सांगत काखा वर केल्या आहेत. त्यामुळे अच्छे दिन जाऊद्या, पण किमान बरे दिन तरी वाट्याला येणार का, असा प्रश्न सर्वसामान्य करत आहेत.

गेल्या 16 दिवसांत पेट्रोल सातत्याने महागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रतिलीटर इतके होते. सोमवारी हाच दर 89.44 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे.

नांदेड शहर
पेट्रोल 91.00,
डिझेल 78.65

धर्माबाद तालुका, जिल्हा नांदेड
पेट्रोल 92.19,
डिझेल 82.89

उमरी तालुका, जिल्हा नांदेड
पेट्रोल 91.89,
डिझेल 79.49

मुंबई
पेट्रोल- 89.44 रुपये
डिझेल- 78.33 रुपये

summary- petrol reached highest rate in nanded