
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथील शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहचले. शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून शिवप्रेमी व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींची पावले शिवतीर्थावरील शक्तीस्थळाकडे वळली. अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… एकच ब्रॅण्ड… ठाकरे ब्रॅण्ड… अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
मान्यवरांची उपस्थिती

शक्तीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, चंदूमामा वैद्य, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शक्तिस्थळावर श्रद्धांजली वाहिली.

रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

शक्तिस्थळावर शिवसेना नेते युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे नतमस्तक झाले.

तेजस ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला वंदन केले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला फुले वाहून ते तिथे नतमस्तक झाले. यावेळी आमदार सुनील राऊत, संदीप राऊत, उपनेते संजय सावंत त्यांच्यासोबत होते.

शक्तीस्थळावर मुख्य वितरक दांगट न्यूजपेपर एजन्सीचे चारुदत्त बाजीराव दांगट यांनी अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. ‘जरी माझ्या पार्थिवाला शिवतीर्थावर अग्नी दिला, तरी तुम्ही या ज्वालेची मशाल अशीच धगधगती ठेवा’, असा संदेश रांगोळीतून देण्यात आला.

शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला आदरांजली वाहताना शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू.

शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

पोलिसांनीही शिवसेनाप्रमुखांना वंदन केले.

अनेक शिवसैनिक भगवा हाती घेऊन नतमस्तक झाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर अभिवादन करताना…

ज्येष्ठ शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली.





























































