
गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो निष्ठावंत शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर गर्दी केली होती.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मानवंदनेचा स्वीकार केला.
शिवसेनाप्रमुखांनी धगधगत्या विचारांनी मराठी माणसाच्या जीवनाचा उद्धार केला.
आजही त्यांचे विचार मराठी जन आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करीत असतात.
त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या नेत्याला वंदन करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर शिवसैनिकांचे जथेच्या जथे दाखल झाले होते.