
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पूर आला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, शेतकरी हवालदील झाला आहे. अतिवृष्टीमुळे लातूरमधील नद्या, ओढे, धरणे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नद्यांवरील पूल, रस्ते पाण्याखाली गेले असून 43 मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.